“मन की बात” – विचारांचा अनमोल ठेवा!
आज माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा यशस्वीरित्या पार पडलेला १३१ वा भाग पाहण्याचा योग आला. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस देशवासीयांना एका सूत्रात बांधणारा हा संवाद आजही तितकाच प्रेरणादायी ठरला. या प्रसंगी भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवनजी त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती लाभली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण झाला. आरे मंडळ अध्यक्ष श्री. महेंद्रजी झगडे व धडक कामगार युनियनचे अध्यक्ष आणि भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. अभिजितजी राणे यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आम्ही मोदीजींचे विचार अनुभवले. पंतप्रधानांचे हे शब्द आपल्याला अधिक मजबूत, स्वावलंबी आणि विकसित भारताकडे जाण्यासाठी सदैव ऊर्जा देत राहतील!
हार्दिक अभिनंदन!
काल आदरणीय उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. संतोषजी मेढेकर यांची ‘बेस्ट’ (BEST) समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल, त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संतोषजींच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि नेतृत्वाचा ‘बेस्ट’ प्रशासनाला नक्कीच मोठा फायदा होईल, असा आम्हाला विश्वास आहे. याप्रसंगी आरे मंडळ अध्यक्ष श्री. महेंद्रजी झगडे, आरे मंडळ उपाध्यक्ष श्री. डी. डी. सावंतजी आणि आरे मंडळ सचिव श्री. शरदजी हिरस्कर उपस्थित होते.
आजचा दिवस खूपच खास!
आज तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लाडके, जनसामान्यांचे कैवारी आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री. सचिनजी कल्याणशेट्टी साहेब यांची भेट घेण्याचे परमभाग्य लाभले. त्यांच्याशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. साहेबांचे जनसेवेतील समर्पण आणि कामाचा झपाटा खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत, याची प्रचिती त्यांच्या भेटीतून पुन्हा एकदा आली. अतिशय आपुलकीने आणि अगत्याने स्वागत केल्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार!
नवा संकल्प, विजयाचा निर्धार!
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आरे मंडळाच्या’ वतीने आज वार्ड क्रमांक 53 मध्ये आगामी महानगरपालिका निवडणूक साठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार बहुमताने निवडून आणणे आणि प्रभागाच्या विकासाला गती देणे हा होता . यावेळी आरे मंडळातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत 3 जानेवारीला भाजप ,शिवसेना, आरपीआय च्या महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ , निवडणुकीच्या रणनीतीवर आणि जनसंपर्कावर सविस्तर चर्चा करण्यात आली .
वाढदिवस हा केवळ एक दिवस नसून, आपल्या माणसांनी दिलेल्या प्रेमाचा सोहळा असतो!
काल माझा वाढदिवस माझे लहानपणीचे मित्र आणि भारतीय जनता पार्टी ‘आरे मंडळा’चे अध्यक्ष श्री. महेंद्र झगडे यांच्या पुढाकाराने व भाजपच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सर्वांच्या या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मी मनापासून ऋणी आहे. आपला स्नेह असाच कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
भाजप आरे मंडळातर्फे वार्ड ५२, ५३ चा कार्यकर्ता मेळावा: मिशन मुंबईसाठी मार्गदर्शन!
आज बाजपा (भाजप) आरे मंडळातर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला! आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण नेते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते: कांदिवलीचे आमदार श्री. अतुल भातखळकर जी , जिल्हा अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई ॲडव्होकेट ज्ञानमूर्ती शर्मा जी, आरे मंडळ अध्यक्ष श्री. महेंद्र झगडे जी माननीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यावर भर दिला आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी जनसंपर्क मोहिम राबवण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या तयारीसाठी एक नवा उत्साह संचारला आहे! आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर दृढ विश्वास ठेवून मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज आहोत. आरे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व मंडळातील वार्ड ची माझी नगरसेविका यांच्या सक्रिय सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार! चला, एकजुटीने काम करूया आणि मुंबईत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवूया!














































































