गरोदरपणाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे काम करावे लागणाऱ्या महिलांना मदत मिळावी आणि आई-बाळाचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने पंतप्रधान मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत केली जाते आणि बाळाला कुपोषणापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.
पात्रता निकष
- अर्जदार गर्भवती महिला असावी.
- अर्जदार महिलेचे वय किमान १९ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- पहिल्यांदा गर्भवती झालेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो.
- गर्भधारणेमुळे काम करू न शकल्याने मजुरी किंवा उत्पन्न मिळत नसल्यास संबंधित महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार महिला व पतीचे सहमतीपत्र
- अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा
- अर्जदार महिला आणि पतीचे आधार कार्ड
- घरपट्टी पावती
- अर्जदार महिलेचे आधार लिंक असलेले बँक खाते किंवा पोस्ट खाते
- वीजबिल / रेशन कार्ड
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- रहिवासी दाखला
- महिलेचा किंवा पतीचा मोबाईल क्रमांक
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
- जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अर्ज करता येतो.
- तसेच अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करूनही अर्ज करता येतो: https://pmmvy.nic.in/
