मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येते. या योजनेमुळे मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होते.
पात्रता निकष
- अर्जदाराचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹7.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- पहिल्या मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ६ महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
- एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित असावी आणि किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे आधार कार्ड
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
- पालकांचे संमतीपत्र (अनाथ मुलींसाठी – बाल कल्याण समितीचा दाखला)
- PMJDY अंतर्गत बचत खाते
अधिक माहिती व अर्जासाठी
या योजनेविषयी अधिक माहिती किंवा अर्जासाठी स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्याशी संपर्क साधावा.
