जिल्हा-उपाध्यक्ष सोशल मीडीया उ.प. मुंबई आणि सचिव-आरे मंडळ जोगेश्वरी पूर्व विधानसभा

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

शेतकऱ्यांना वीज बिलाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि ‘शून्य वीज बिल’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी पंपांना वीज सवलत दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही स्वतंत्र कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीपंपाची माहिती महावितरण कंपनीकडे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

पात्रता

महाराष्ट्रातील ७.५ HP पर्यंत क्षमतेचे कृषी पंप वापरणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

अर्ज कुठे करायचा?

या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.
महावितरण कंपनीकडे नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ थेट दिला जातो.

शरद हेमंत हिरस्कर
कॉपीराइट © २०२६ शरद हेमंत हिरस्कर. सर्वाधिकार सुरक्षित.