महाराष्ट्रातील युवक-युवतींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना ६ महिन्यांच्या कालावधीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रशिक्षणादरम्यान शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिले जाते.
शैक्षणिक पात्रतेनुसार स्टायपेंड
- १२वी उत्तीर्ण: ₹6,000 प्रति महिना
- ITI / डिप्लोमा: ₹8,000 प्रति महिना
- पदवीधर / पदव्युत्तर: ₹10,000 प्रति महिना
पात्रता
- अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने NAPS / MAPS योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार सध्या कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (१२वी / ITI / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर)
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र (उदा. मतदान ओळखपत्र)
- मोबाईल नंबर (आधार आणि बँक खात्याशी संलग्न)
- स्वयंघोषणापत्र (आवश्यक असल्यास)
अर्ज कुठे करायचा?
https://cmykpy.mahaswayam.gov.in/UserLogin.aspx या पोर्टलवर Job Seeker म्हणून नोंदणी करून अर्ज करता येतो.
अधिक माहितीसाठी
जवळच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात भेट द्या.
किंवा 1800 120 8040 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
