राज्यात सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप बसवून दिले जातात.
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा
- आधार कार्ड
- मागासवर्गीय जाती / जमातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- सामायिक शेती असल्यास इतर भागीदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र
- पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र
- कालवा किंवा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र
पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतात शाश्वत जलस्त्रोत (विहीर, बोरवेल किंवा शेततळे) असावा.
- अर्जदाराकडे पारंपरिक वीज जोडणी नसावी.
- महावितरणकडे पैसे भरूनही वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
अर्ज कुठे करायचा?
या योजनेसाठी महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो: https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
