ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्के घर उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने रमाई आवास योजना राबविण्यात येते. ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबांसाठी लागू आहे.
पात्रता निकष
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावा.
- ४०% किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींनाही योजनेचा लाभ मिळू शकतो.
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारा
- घरपट्टी, पाणीपट्टी किंवा वीज बिलाची पावती
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मतदार ओळखपत्र
- शिधापत्रिका
- सरपंच / तलाठी यांचे प्रमाणपत्र
- महानगरपालिका किंवा नगरपालिका मालमत्ता कराची पावती
अर्ज कुठे करावा?
या योजनेविषयी अधिक माहिती किंवा अर्जासाठी खालील कार्यालयांशी संपर्क साधावा:
- समाज कल्याण कार्यालय (सहाय्यक आयुक्त)
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक
- जिल्हा परिषद / महापालिका आयुक्त कार्यालय
