जिल्हा-उपाध्यक्ष सोशल मीडीया उ.प. मुंबई आणि सचिव-आरे मंडळ जोगेश्वरी पूर्व विधानसभा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत व्यावसायिक तसेच बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात सवलत दिली जाते. विशेषतः मुलींना १००% शुल्क माफी, तर इतर पात्र विद्यार्थ्यांना ५०% पर्यंत शुल्क सवलत दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (₹८ लाखांपेक्षा कमी)
  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • CAP प्रवेशाशी संबंधित कागदपत्र (उदा. CAP Allotment Letter)
  • शैक्षणिक गॅप असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्र
  • दोन मुलांचे कौटुंबिक घोषणा प्रमाणपत्र
  • उपस्थिती प्रमाणपत्र
  • शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क भरल्याची पावती

पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने CAP प्रक्रियेद्वारे व्यावसायिक किंवा बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
  • ही योजना कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांपर्यंत लागू आहे.
  • अर्जदाराने इतर कोणतीही शिष्यवृत्ती किंवा आर्थिक मदत घेतलेली नसावी.
  • Distance Education, Virtual Learning किंवा Part-time अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू नाही.
  • अभ्यासक्रमादरम्यान २ वर्षांपेक्षा जास्त शैक्षणिक गॅप नसावा.

अर्ज कुठे करायचा?

या योजनेविषयी अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या:
https://mahadbt.maharashtra.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A4CECAB91C2B36920

शरद हेमंत हिरस्कर
कॉपीराइट © २०२६ शरद हेमंत हिरस्कर. सर्वाधिकार सुरक्षित.