कामाच्या निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पूर्वी सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ घेणे कठीण जात असे. ही समस्या दूर करण्यासाठी वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे लाभार्थी नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेच्या आधारे देशातील कोणत्याही रेशन दुकानातून अन्नधान्याचा लाभ घेता येतो.
अर्ज कुठे करावा?
या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
मात्र आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याने आधार कार्ड अद्ययावत (अपडेट) करणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर रेशन कार्डची माहितीही अद्ययावत होते आणि योजनेचा लाभ घेता येतो.
हेल्पलाईन क्रमांक
१४४४५
