देशातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत जनआरोग्य योजना (PM-JAY) सुरू केली आहे. ही योजना जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनांपैकी एक मानली जाते. या योजनेद्वारे शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते.
कोण अर्ज करू शकतात?
शहरी भागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या खालील प्रकारच्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो:
- धोबी, सुरक्षा रक्षक (वॉचमन)
- मोची (बूट दुरुस्ती करणारे)
- कचरा गोळा करणारे कामगार
- फेरीवाले आणि पथविक्रेते
- मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन आणि दुरुस्ती करणारे कामगार
- प्लंबर, सुतार, गवंडी आणि हमाल
- घरकाम करणारे कामगार
- वेल्डर आणि पेंटर
- सफाई कर्मचारी
- ड्रायव्हर, कंडक्टर, हेल्पर तसेच रिक्षा किंवा वाहन चालक
- हस्तकला कारागीर
- लघुउद्योगांमध्ये मदतनीस म्हणून काम करणारे
- टेलर (शिंपी)
- डिलिव्हरी बॉय, दुकानदार आणि हॉटेलमधील वेटर
पात्रता अटी
- कुटुंबाकडे दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी वाहन तसेच मोटारवर चालणारी मासेमारी बोट नसावी.
- ५०,००० रुपयांपर्यंतची क्रेडिट मर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्ड नसावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी किंवा शासकीय सेवेत नसावा.
- कुटुंबातील सदस्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या बिगर-कृषी उद्योगांमध्ये काम करत नसावा.
- कुटुंबाचे मासिक उत्पन्न १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- घरात फ्रिज आणि लँडलाईन फोन नसावा.
- कुटुंबाच्या नावावर पक्के व सुसज्ज घर नसावे.
- कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त शेती जमीन नसावी.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम आयुष्मान भारत PM-JAY च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://beneficiary.nha.gov.in
- वेबसाइटवर “मी पात्र आहे का?” (Am I Eligible) या पर्यायावर क्लिक करून आपली पात्रता तपासा.
- आवश्यक माहिती भरून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- ऑनलाइन अर्ज करताना अडचण येत असल्यास, जवळच्या CSC (Common Service Center) मध्ये जाऊन अर्ज करता येतो.
- अर्ज केल्यानंतर आधार क्रमांकाच्या माध्यमातून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
