राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणाला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे पात्र मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते.
मुख्य वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत एकूण ₹१,०१,०००/- इतकी आर्थिक मदत विविध टप्प्यांमध्ये DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- जन्माच्या वेळी: ₹५,०००
- इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर: ₹६,०००
- इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर: ₹७,०००
- इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यावर: ₹८,०००
- वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹७५,०००
पात्रता निकष
- मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा.
- कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा कमी असावे.
- मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असावेत.
- दुसऱ्या प्रसूतीत जुळ्या मुली जन्माला आल्यास दोन्ही मुलींना लाभ मिळू शकतो, मात्र पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
आवश्यक कागदपत्रे
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- मुलगी व पालकांचे आधार कार्ड
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून)
- मुलीचा पासपोर्ट साइज फोटो
- बँक खात्याचा तपशील (पासबुकची प्रत)
- शैक्षणिक टप्प्यावर लाभ मिळण्यासाठी संबंधित शाळेचा दाखला
अर्ज प्रक्रिया
ऑफलाइन:
जवळील अंगणवाडी केंद्र, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधून अर्ज करता येतो.
ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतो:
https://womenchild.maharashtra.gov.in
अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाते.
