नमो ड्रोन दीदी योजनेचा उद्देश महिला बचत गटांमधील महिलांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेद्वारे ड्रोनच्या सहाय्याने शेतीकामे सुलभ करून महिलांना १ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
महिलांसाठी पात्रता
- अर्ज करणारी महिला १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची असावी.
- किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाची सदस्य असणे अनिवार्य आहे.
कर्जाची रक्कम
- ड्रोन खरेदीसाठी एनडीडीवाय (NDDY) योजनेतून ८०% म्हणजे सुमारे ८ लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
- उर्वरित रक्कम AIF मार्फत ३% सबव्हेन्शनवर कर्ज स्वरूपात उपलब्ध होऊ शकते.
प्रशिक्षण
- जवळच्या RPTO केंद्रामध्ये १५ दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण दिले जाते.
- ड्रोन असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी RPTO मध्ये ५ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.
अर्ज कुठे करावा?
दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही महिला बचत गटामध्ये नावनोंदणी करून या योजनेसाठी अर्ज करता येतो.
अधिक माहितीसाठी
अधिकृत संकेतस्थळ: https://namodronedidi.php-staging.com/
