जिल्हा-उपाध्यक्ष सोशल मीडीया उ.प. मुंबई आणि सचिव-आरे मंडळ जोगेश्वरी पूर्व विधानसभा

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ८० कोटी गरजू नागरिकांना दर महिन्याला ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पात्रता निकष

१) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे

  • केशरी शिधापत्रिका धारक
  • अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी

२) पुढील प्रकारच्या व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे

  • विधवा
  • दिव्यांग व्यक्ती
  • गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती
  • ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक
  • ज्यांच्याकडे सामाजिक आधार किंवा उपजीविकेचे साधन नाही अशा एकट्या (सिंगल) स्त्री किंवा पुरुष

३) इतर लाभार्थी

  • भूमिहीन शेतमजूर
  • अल्पभूधारक शेतकरी
  • ग्रामीण भागातील कारागीर
  • असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर किंवा कारागीर
  • आदिवासी समाजातील कुटुंबे
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जनधन खाते / बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • मनरेगा कार्ड

लाभ कसा घ्यावा?

या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. रेशन कार्डच्या आधारे आपल्या जवळच्या रेशन दुकानातून या योजनेचा लाभ घेता येतो.

शरद हेमंत हिरस्कर
कॉपीराइट © २०२६ शरद हेमंत हिरस्कर. सर्वाधिकार सुरक्षित.