असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजूर, चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकाम करणारे तसेच इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा दिली जाते.
पात्रता निकष
- अर्जदाराचे वय १५ ते ४० वर्षांदरम्यान असावे.
- अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा, ज्याला नियमित पगार, रजा किंवा पेन्शनची सुविधा उपलब्ध नाही.
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँक सेव्हिंग अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार EPFO, NPS किंवा ESIC यांसारख्या योजनांचा लाभार्थी नसावा.
- अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात कायम, तात्पुरत्या किंवा कंत्राटी स्वरूपात काम केलेले नसावे.
- अर्जदाराने आयकर भरलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- मोबाईल क्रमांक
- योजनेनुसार पहिले मासिक अंशदान
- श्रम UAN कार्ड क्रमांक (ऐच्छिक)
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पर्याय वापरता येतात:
- जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येतो.
- किंवा अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून अर्ज करता येतो: https://maandhan.in/
